वर्तमानपत्र
वाशिम-अकोला मार्गे नांदेड-कुर्ला रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्याची खासदार संजय देशमुख यांची संसदेत जोरदार मागणी
माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
आज यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार मा.संजय देशमुख साहेब यांनी संसदेत नांदेड ते कुर्ला मार्गे वाशिम–अकोला या नव्या रेल्वे सेवेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जोरदारपणे मांडला.त्यांनी सांगितले की, 29 ऑगस्ट 2023 रोजी केंद्रीय रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्ड यांनी नांदेड–कुर्ला व्हाया वाशिम–अकोला या स्थायी रेल्वेगाडीला औपचारिक मंजुरी दिली होती. 17665/66 आणि 17667/68 अशा क्रमांकाने मंजूर झालेली ही सेवा वाशिम जिल्ह्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार होती.
नवी दिल्ली : यवतमाळ-वाशिम लोकसभेचे खासदार मा. संजय देशमुख यांनी आज लोकसभेत वाशिम जिल्ह्याच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रेल्वे सेवेसंदर्भात ठोस आणि मुद्देसूद भूमिका मांडली. नांदेड-कुर्ला मार्गे वाशिम-अकोला अशी नवी रेल्वे सेवा २९ ऑगस्ट २०२३ रोजी केंद्रीय रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्ड यांनी अधिकृतरीत्या मंजूर केली तरीही, दोन वर्षांहून अधिक काळ सेवा प्रत्यक्षात सुरू न झाल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 17665/66 आणि 17667/68 या क्रमांकांनी मंजूर झालेली ही रेल्वे सेवा वाशिम जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सभागृहात अधोरेखित केले. वाशिम हा आकांक्षित जिल्हा असल्याने विकासाच्या प्रत्येक संधीचे महत्त्व अधिक आहे आणि रेल्वे सेवेत झालेल्या विलंबामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईकडे वाशिम जिल्ह्यातून एकही थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, कामगार, व्यापारी अशा प्रवाशांना प्रवासात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. ही नवीन रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होईल. तसेच, वाशिम, अकोला आणि परिसरातील स्थानकांवर आवश्यक सुविधा विकसित होऊन स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या नव्या संधीही निर्माण होतील, असे त्यांनी अधोरेखित केले.
व्हिडिओ द्वारे बातम्या
Latest News:
Digras - खा.संजय देशमुख यांच्यासह शेतकऱयांनी चटणी भाकरी खावुन केले काळी दिवाळी शिदोरी आंदोलन
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
संपूर्ण न्युज पहा काय म्हणाले संजय देशमुख
Latest News:
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नांदेड–कुर्ला (मुंबई) व्हाया वाशिम ही दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेली रेल्वेगाडी तात्काळ सुरू करण्याची मागणी संसदेत केली. वाशिम हा आकांक्षित जिल्हा आहे. या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, नागरिकांना थेट मुंबई जोडणी मिळावी, म्हणून हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सभागृहात मांडला.
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
संपूर्ण न्युज पहा काय म्हणाले संजय देशमुख
Latest News:
लोकसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२४ | Sanjay Deshmukh |
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
संपूर्ण न्युज पहा काय म्हणाले संजय देशमुख
ताजी बातमी:
यवतमाळ रेमंड कंपनी कर्मचाऱ्यांच्या संपा बद्दल लोकसभेतील खासदार श्री.संजय देशमुख साहेब यांचे भाषणं.
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
संपूर्ण न्युज पहा काय म्हणाले संजय देशमुख
Latest News:
महाराष्ट्राती शेतकऱ्यांच्या ह्क्कासाठी व न्यायासाठी मोर्चा काढणार- संजय देशमुखांचे आवाहन
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
संपूर्ण न्युज पहा काय म्हणाले संजय देशमुख
ताजी बातमी:
बोदेगाव प्रा. आ. केंद्र येथे कोविड सेंटर सुरू करा.- संजय देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾
संपूर्ण न्युज पहा काय म्हणाले संजय देशमुख
ताजी बातमी:
महाराष्ट्र दिनाच्या पुर्व संध्येला संजय देशमुख यांचा अभिनव उपक्रम होणार सुरू
उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाईक यांची राहण्याची व जेवणाची करणार व्यवस्था
600 व्यक्ती राहू शकतील अश्या फॉर्मसी कॉलेज मध्ये करणार व्यवस्था
ज्यांचा घरचा करता धरता पॉझिटिव्ह येऊन विलगिकरणामध्ये आहे अश्या नातेवाईकांची सुद्धा करणार व्यवस्था
सोशल मीडिया पोस्ट
गुटखा तस्करीवर कठोर कारवाई
यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या गुटखा तस्करीवर कठोर कारवाई करण्यासाठी यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार श्री. संजय देशमुख साहेब यांनी देशाचे प्रधानमंत्री जी यांना पत्र लिहून केली.
आदिवासी बांधवांच्या अडचणी
दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे खनिज विकास प्रतिष्ठानची बैठक पार पडली..
खनिज विकास प्रतिष्ठानची बैठक
येथे दुष्काळामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत आम्ही आदिवासी विकास मंत्रिमंडळाकडे तातडीने निवेदन सादर केले आहे. स्थानिक आदिवासी बांधवांच्या अडचणी दूर होऊन आवश्यक मदत लवकर मिळावी, हाच आमचा प्रमुख आग्रह आहे.
विकास कामे संबंधित चर्चा
जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीस उपस्थित राहून, जिल्ह्यातील विविध सरकारी योजना आणि विकास कामे संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मंत्री श्री.मनसुख मांडविया जी यांची भेट
आज दि.31 जुलै रोजी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री श्री.मनसुख मांडविया जी यांची भेट घेऊन यवतमाळ येथे रेमंड कंपनी मधील कामगारांच्या सुरू असलेल्या संपा बद्दल भेटून निवेदन दिले.
कामगारांच्या प्रश्नावर संसदेत
दि.१ ऑगस्ट रोजी केदारेश्वर महादेव मंदिर, यवतमाळ येथे रेमंड कंपनीतील कामगारांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठवल्याबद्दल कामगार बांधवांनी आभार कार्यक्रमास उपस्थितीत राहीलो.
chemotheroy या उपचारासाठी 50,000 हजार आर्थिक मदत
यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री. संजय देशमुख साहेब यांच्या विशेष प्रयत्नामुळे व पाठपुराव्यामुळे श्रीमती नसेहा शेख रा. यवतमाळ यांच्या chemotheroy या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 50,000 हजार आर्थिक मदत मंजूर !!
रक्तदान शिबिरास भेट
ईद-ए-मिलाद च्या पावन दिनानिमित्त दिग्रस येथील कच्छी चौकात आयोजित मिरवणुकीत सहभागी होऊन सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व ग्रामीण रुग्णालय दिग्रस येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास भेट दिली.
एक लाख रुपयाची आर्थिक मदत
खासदार संजयभाऊ देशमुख यांच्या विशेष प्रयत्नाने व पाठपुराव्यामुळे, रामेश्वर नाईक साहेब प्रमुख मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तथा अँड .विशालभाऊ ठाकरे यांच्या सहकार्याने श्री.कमलकीशोर खेतूलाल भुतडा रा.कारला रोड शिवाजी नगर, वर्धा,ता.जि.वर्धा यांच्या RTA With Cervicalwith Lumber Cord Injury Left Elbow शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून तातडीने एक लाख रुपयाची आर्थिक मदत मंजूर.
79 व्या स्वातंत्र्य
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला.
चक्रीवादळामुळे नुकसान
पुसद तालुक्यात अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे वनवार्ला, चोंढी, बाणशी, पिंपळगाव व मुंगशी या गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील उभी पिके, झाडे, घरांचे छप्पर, पशुधन आणि शेतीसाठी उपयोगात येणारे साहित्य यांचेही नुकसान झाले.
(ADIP) योजनेचे शिबीर
दिव्यांग बंधू आणि भगिनींसाठी (ADIP) योजनेचे शिबीर तसेच ६० वर्षे पेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रिय वयोश्री योजना (RVY) योजने अंतर्गत मोफत सहाय्यभूत साधने वाटपासाठी पूर्वतपासणी शिबिराचे आयोजन केले होते.
पाणी प्रश्न
दि.१७ एप्रिल रोजी पुसद येथील माळपठारावरील ४२ गावांच्या पाणी प्रश्न लोकसभा मध्ये उपस्थितीत केल्याबद्दल फेट्रा येथे सत्कार सोहळा संपन्न झाला
Bone Marrow Transplant
खासदार श्री.संजय देशमुख साहेब यांच्या प्रयत्नातून चि. शंतनू मोहनराव खारकर रा.रावेरी ,ता.राळेगाव ,जि.यवतमाळ यांच्या Bone Marrow Transplant शस्त्रक्रिया करण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीतून रू.3,00,000 (रुपये तीन लाख)चे अर्थसहाय्य मंजूर.
लिफ्ट इरिगेशन सिस्टीम प्रणाली
पुसद येथील माळपठारातील ४२ गावांसाठी इसापूर धरणातून व दिग्रस येथील अरुणावती प्रकल्पातून दिग्रस भागातील शेतकऱ्यांसाठी लिफ्ट इरिगेशन सिस्टीम प्रणाली सुरू करण्याची मागणी केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील जी यांना भेटून केली.
प्रधानमंत्री ग्राम सडक
आज धानोरा घाडगे येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा तीन (2024-25) अंतर्गत पुलांचे उद्घाटन संपन्न झाले.
कृषी अनुसंधान परिषद (ICAR)
नागपूर येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) चे संचालक डॉ. दिलीप घोष यांची सदिच्छा भेट घेतली.
बैठक AIIMS नवी दिल्लीच्या कामकाजासंदर्भात
आज नवी दिल्ली येथील संसदीय सौंधमध्ये AIIMS नवी दिल्लीच्या कामकाजासंदर्भात स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत खासदार श्री. संजय देशमुख यांनी रुग्णांना येणाऱ्या महत्त्वपूर्ण समस्या मांडल्या.
नवीन रेल्वे मार्ग मंजूर
नवीन रेल्वे मार्ग मंजूर करून तातडीने काम सुरू करावे
रस्ते विकास प्रकल्पांसाठी भेट
यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्ते विकास प्रकल्पांसाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री श्री.नितीन जी गडकरी साहेब यांची विविध मागण्यांसाठी भेट घेतली.
आयोजित कृषीक २०२५
आज बारामती येथे आयोजित कृषीक २०२५ या प्रदर्शनास भेट देऊन शेती क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतींविषयी माहिती घेतली.
ग्रा.मा १०२ या रस्त्याच्या सुधारणा
आज वाशिम येथे प्र.रा.मा ते पांचाळा ग्रा.मा १०२ या रस्त्याच्या सुधारणा कामाचे उद्घाटन केले.
विजयी रॅली
जनतेचे आभार व्यक्त करतांना मा. आमदार श्री. संजय भाऊ देशमुख.
कबड्डी स्पर्धा
महाराष्ट्र शासन असोसिएशन द्वाराआयोजित कबड्डी स्पर्धेत मा . आमदार श्री. संजय भाऊची उपस्थिती.
विजयी रॅली
निवडणूकिमध्ये यश प्राप्त झाल्यानंतर विजयाचा जल्लोष...
संत संमेलन
कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रस येथे आयोजित संत संमेलन -श्री. संजय भाऊ देशमुख.
लाडु तुला
श्री. संजय भाऊ देशमुख वजनात तोलून लाडूचा वाटप...
बौद्ध मंदिर
बौद्ध मंदीराचे बांधकामाची सुरुवात त्या जागेचे भूमिपूजन मा. आमदार श्री. संजय भाऊ देशमुख यांच्या हस्ते.
संजय उत्तमराव देशमुख